आपल्या भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने आदिवासी शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यापैकी आज आपण आदिवासी शेतकरी योजना या योजनेतून तुम्हाला शेती सुरू करण्यासाठी लागणारे पैसे , उपकरणे, सिंचन, पिक उत्पादन आणि पशुपालनासाठी विशेष अनुदान मिळते, तरी पुढे आपण या योजनेबद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत.
आदिवासी शेतकरी योजना म्हणजे काय?
ही योजना आपल्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी करणे, शेतीत प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, सिंचन, बियाणे, खत, शेती अवजारे आणि पशुपालन व्यवसायासाठी आर्थिक मदत करणे यासाठी सुरू केली आहे.
वनवासी व आदिवासी समाजातील कुटुंबांना स्वावलंबी (स्वतःच्या मेहनतीवर अवलंबून राहणारा), बनवून देणे आणि लवकरात लवकर आर्थिक व सामाजिक विकास होईल. यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.
योजनेखाली मिळणारे प्रमुख लाभ
(1) शेती अवजारे व उपकरणांवर विशेष अनुदान
1)रोटाव्हेटर(माती भुसभुशीत करण्यासाठी उपयोगात येते.
2)पॉवर टिलर((लहान ट्रॅक्टरसारखे असते)
3)स्प्रे पंप(पिकांवर औषधांची फवारणी करण्यासाठी वापरतात.अवजारे किट(शेतीकामासाठी लागणारी अवजारे एकत्रित ठेवण्याचा संच म्हणजे अवजारे किट.)
3)कडबा कटर(बैलांसाठी चारा लहान तुकड्यांमध्ये करण्यासाठी उपयोगात येतो),
4)नांगर,
5)वीट नांगर
ट्रॅक्टर बरोबर लागणारी साधने
अनुदान: 50% ते 80% पर्यंत (योजना व विभागानुसार)
(2) बियाणे व खत सबसिडी
सुधारित बियाणे
सेंद्रिय व रासायनिक खते
अनुदान: 75% पर्यंत अनुदान
पिक उत्पादन वाढवण्यासाठी विशेष सवलत दिली जाते.
(3) सिंचनासाठी आर्थिक मदत
ठिबक सिंचन (Drip)
तुषार सिंचन (Sprinkler)
पाणी साठवण टाक्या (Farm Pond)
अनुदान: 60% ते 90%
आदिवासी क्षेत्रातील अल्प पाणी उपलब्धतेचा प्रश्न सोडवण्यासाठी ही मोठी मदत आहे.
(4) पशुपालनासाठी अनुदान
गाय–म्हैस खरेदीसाठी मदत
शेळी पालन
कुक्कुटपालन
अनुदान: 40% ते 75%
ग्रामीण उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना मोठा उपयोगाची आहे.
(5) घरगुती उद्योगासाठी लाभ
आदिवासी महिलांसाठी:
मसाला उत्पादन
शेळी–मेंढी पालन
बांबू उत्पादन उद्योग
घरगुती खाद्य पदार्थ
यावरही शासनाकडून प्रशिक्षण व आर्थिक मदत दिली जाते.
6) कोण पात्र आहेत? (Eligibility)
अर्जदार आदिवासी समाजातील असावा
नाव ग्रामपंचायत/तहसीलदार नोंदणीमध्ये असावे
कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल (BPL/इतर प्रमाणपत्र)
शेती जमीन किंवा व्यवसायाची जागा असणे
7) आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
जातीचा दाखला (Scheduled Tribe Certificate)
शेती 7/12 उतारा
बँक पासबुक
निवास प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
अर्ज फॉर्म (ऑनलाइन/ऑफलाइन)
8) अर्ज कसा करावा? (Online Apply)
तुम्ही खालील पोर्टलवर अर्ज करू शकता:
(1) महाडीबीटी पोर्टल
https://mahadbt.maharashtra.gov.in
येथे आदिवासी विभाग व कृषी विभागाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत.
(2) आदिवासी विकास विभाग कार्यालय
ग्रामसेवक / तलाठी / कृषी सहाय्यक यांच्या मदतीने ऑफलाइन अर्जही करता येतो.
9) योजनेचे मुख्य फायदे
शेतीवरील खर्च कमी
पिक उत्पादन वाढ
आधुनिक शेती तंत्रज्ञान उपलब्ध
सिंचनाची व्यवस्था सुधारते
पशुपालन व घरगुती उद्योगातून अतिरिक्त उत्पन्न