ठिबक सिंचन अनुदान योजना – शेतीत पाण्याची बचत कशी करावी?

आजच्या काळात पाण्याची मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे आणि अशा परिस्थितीत शेती करायचा ठरवल्यास शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. पावसाचे पाणीही आता अनियमितपणे येते, त्यामुळे नद्या पूर्णपणे आटतात, विहिरी सुकून जातात आणि खाणी, तलाव यांतील पाणीही कमी होते. त्यामुळे शेती करणे अत्यंत कठीण बनते.

अशा परिस्थितीत आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन अनुदान योजना सुरू केली आहे. ही योजना पाण्याची बचत करण्यासाठी आणि उत्पादनवाढीसाठी सर्वोत्तम उपाय ठरली आहे.

ठिबक सिंचन म्हणजे काय?
ठिबक सिंचन ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये पाणी थेट पिकाच्या मुळाशी थेंब-थेंब देण्यात येते. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते, पिकाला आवश्यक तेवढेच पाणी पुरवता येते आणि पिकाला कोणताही परिणाम होत नाही.

ठिबक सिंचनाचे फायदे

  1. पाण्याची बचत ५०%-६०% पर्यंत होते – सिंचनामुळे पाणी थेट पिकाच्या मुळाशी जाते.
  2. उत्पादनात २०%-३०% वाढ होते – पिकाला योग्य प्रमाणात ओल मिळाल्यामुळे उत्पादन चांगले होते.
  3. खताचीही बचत होते – खत थेट पिकाच्या मुळाशी दिले जाते.
  4. गवत व इतर अडथळ्यांवर खर्च कमी येतो – पाणी पिकाच्या मुळाशी दिले जाण्यामुळे पाणी वाया जात नाही आणि गवत देखील वाढत नाही.

ठिबक सिंचन अनुदान योजना – पात्रता
शेतकरी हा महाराष्ट्राचा असावा.

७/१२ वर स्वतःचे नाव असावे, म्हणजे ७/१२ स्वतःच्या नावावर असावे.

सर्वप्रथम लहान व मध्यम वर्गीय शेतकरी व महिला शेतकऱ्यांना लाभ मिळेल.

किती अनुदान मिळते

सर्वसाधारणपणे ठिबक सिंचनासाठी ५०%-७०% पर्यंत अनुदान मिळते.

पिकाचा प्रकार काय आहे,

ठिबक कंपनीची मान्यता,

जमिनीचा प्रकार व सिंचनाचे क्षेत्रफळ यावर अवलंबून असते.

ठिबक सिंचन योजना अर्ज कसा करावा?

१. सर्वात पहिले MahaDBT पोर्टलवर नोंदणी करा
https://mahadbt.maharashtra.gov.in
कृषी विभाग → “ठिबक/फवारणी/क्षेत्र विकास” योजना निवडा.

२. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

  • आधार कार्ड
  • सातबारा उतारा
  • बँक पासबुक
  • जातीचा दाखला (लागल्यास)
  • मोबाईल क्रमांक

३. कंपनी निवडून कोटेशन घ्या
शासनमान्य ठिबक कंपन्यांकडून कोटेशन घ्या.

४. अर्ज सबमिट करा व मंजुरीची प्रतीक्षा करा
अर्ज पडताळणी झाल्यानंतरच मंजुरी दिली जाते.

५. ठिबक बसवून बिल सादर करा
तांत्रिक अधिकाऱ्यांची पाहणी झाल्यानंतर योजनेची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.










Leave a Comment