पीक विमा योजना 2025 – नुकसान भरपाई कशी मिळते?

आजकालच्या बदलत्या हवामानामुळे कृषी क्षेत्रात मोठे नुकसान होऊ शकते, म्हणून शेतकरी येत्या वर्षी शेती करण्यास नाखूश असतात. आणि या आर्थिक नुकसानाची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) 2025 सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांना दुष्काळ, रोग, इत्यादीमुळे होणारे नुकसान भरून दिले जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळते.

2025 मध्ये पिक विमा योजना, त्यासाठीची पात्रता, अर्ज कसा करावा, आणि नुकसानभरपाई कशी मिळेल याबाबत आपण पूर्ण माहिती घेणार आहोत.

2025 मध्ये पिक विमा योजना, पात्रता, अर्ज कसा करावा, आणि नुकसानभरपाई कशी मिळेल? याबाबत आपण पूर्ण माहिती घेणार आहोत.

पिक विमा योजना 2025 म्हणजे काय?

पिक विमा योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी योजना आहे. यांतून पिकांचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे, रोगांमुळे किंवा बदलत्या हवामानामुळे झाल्यास सरकार आणि विमा कंपनी नुकसानाची भरपाई करतात. यालाच आपण पिक विमा योजना असे म्हणू शकतो.

मुख्य फायदे

  • खूप पाऊस पडल्यावर , गारपीट, दुष्काळ, पूर, चक्रीवादळ आल्यामुळे
    पिकांचे नुकसान भरपाई मिळते.
  • कमी प्रीमियम दर:
    • खरीप: 2%
    • रब्बी: 1.5%
    • वार्षिक/व्यावसायिक पिके: 5%
  • भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होते.
  • पारदर्शक आणि जलद सर्व्हे प्रक्रिया

पात्रता – कोण अर्ज करू शकतो?

  • शेतकरी जमीन नावावर असावी.
  • हिस्सेदारी शेतकरी
  • शेती भाड्याने असली तरी चालेल
  • PM Kisan योजनेचे लाभार्थी (प्रामुख्याने पात्र)
  • खरीप/रब्बी पेरणी केलेले शेतकरी

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 7/12 उतारा
  • बँक पासबुक
  • पीक पेरणीचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • नुकसान झालेल्या पिकांचे फोटो

नुकसानभरपाई कशी मिळते? (Step-by-Step)

1. पिकाचे नुकसान झाल्यानंतर त्वरित तक्रार (Claim) नोंदवा

  • नुकसान झाल्यापासून 72 तासांच्या आत तक्रार करणे आवश्यक असते.
  • तक्रार नोंदवण्याचे मार्ग:
    • मोबाईल app: PMFBY App द्वारे पण तुम्ही करू शकता.
    • पोर्टल: pmfby.gov.in वर जावे.
    • ग्रामसेवक / तलाठी
    • कृषी अधिकारी

2. अधिकारी/विमा कंपनीकडून पंचनामा

  • तक्रार नोंदवल्यानंतर कृषी विभाग व विमा कंपनीचा प्रतिनिधी शेतात किती नुकसान झाले याची नोंद घेतो .
  • नुकसान झालेले क्षेत्र मोजून घेतले जाते.
  • फोटो/व्हिडीओ घेतले जातात.
  • तयार केलेला संपूर्ण report पोर्टलवर अपलोड केला जातो

3. नुकसानाचे मूल्यांकन

  • कृषी विभाग व विमा कंपनी पिकांचे नुकसान किती टक्के झाले याचा अहवाल बनवतात
  • हा अहवाल जिल्हा समितीकडे पाठवला जातो

4. मंजुरी व भरपाईची रक्कम निश्चित

  • नुकसान टक्केवारीनुसार शेतकऱ्याला देय रक्कम निश्चित होते
  • उदा.:
    • 50% नुकसान = अर्धी भरपाई
    • 80–100% नुकसान = पूर्ण भरपाई

5. थेट बँक खात्यात पैसे जमा

  • भरपाई मंजूर झाल्यानंतर DBT मार्फत रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाते.

नुकसानभरपाईची रक्कम किती मिळते?

रक्कम खालील गोष्टींवर अवलंबून असते:

  • पिकाचा प्रकार कोणता आहे.
  • जिल्ह्यानुसार किमान उत्पादन मानक
  • किती टक्के नुकसान झाले त्यानुसार दिल जातो.
  • विमा कंपनीचे नियमांनुसार मिळते.

साधारणपणे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर हजारो ते लाखो रुपयांची भरपाई मिळू शकते.


2025 मधील महत्वाचे बदल (Highlights)

  • तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया अधिक डिजिटल पद्धतीने झाली आहे.
  • सर्व सर्व्हे हे ड्रोनच्या माध्यमातून होतील.
  • नुकसान भरपाई ही 45–60 दिवसांमध्ये मिळते.
  • गावानुसार पिकांची यादी PMFBY पोर्टलवर दिली जाते.

Leave a Comment