महाराष्ट्रात आपल्या शेतकऱ्यांसाठी जास्त उत्पादन मिळावे आणि दीर्घकाळ उत्पन्न मिळत राहावे, यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते. यामध्ये डाळिंब, आंबा आणि केळी या तीन पिकांवर जास्त अनुदान दिले जाते, कारण या फळांना बाजारात जास्त मागणी असते. ही फळबाग लागवड योजना राबवण्यामागचा सरकारचा एकच उद्देश आहे — कमी खर्चात जास्त उत्पादन घेणे आणि उत्पादित फळांच्या निर्यातीमध्ये वाढ करणे, हा मुख्य हेतू आहे.
नमस्कार शेतकऱ्यांनो!
चला तर आज आपण या ब्लॉगमध्ये फळबाग लागवड योजनेची पात्रता, आवश्यक असणारी कागदपत्रे, किती अनुदान मिळते, अर्ज कसा करावा आणि या योजनेचे फायदे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे कृपया सर्व माहिती मनपूर्वक वाचा.
फळबाग लागवड योजना काय आहे?
फळबाग लागवड योजना ही केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आर्थिक मदत योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना फळबाग उभारण्यासाठी आवश्यक ते अनुदान, मार्गदर्शन आणि सुविधा दिल्या जातात.
डाळिंब लागवड अनुदान योजना
✔️ अनुदान किती मिळते?
- प्रति हेक्टर अंदाजे ₹50,000 ते ₹60,000 पर्यंत अनुदान मिळू शकते.
- ठिबक सिंचनासाठी अनुदान उपलब्ध आहे.
✔️ पात्रता
- शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
- जमिनीचा 7/12 उतारा आवश्यक आहे.
- सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असावी.
✔️ फायदे
- कमी खर्चात जास्त उत्पादन काढता येत.
- कमी पाण्यात जास्त पीक घेता येते.
- नर्सरीतून रोपे खरेदी करून लागवड करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते.
- उत्पादन हमखास 2–3 पट वाढू शकते
आंबा लागवड अनुदान योजना
✔️ अनुदान किती मिळते?
- प्रति हेक्टर ₹25,000 ते ₹40,000 पर्यंत अनुदान मिळते.
- आंबा प्रकारानुसार अनुदानात बदल होऊ शकतो
✔️ आंब्याचे प्रमुख प्रकार
- हापूस
- कैरी
- कलमी आंबे
✔️ पात्रता
- कोकण व महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकऱ्यांसाठी योजना उपलब्ध
- जमीन सुपीक असणे आवश्यक आहे.
- जमीन शेतकऱ्याच्या नावावर असावी.
- 7/12 उतारा आवश्यक आहे.
✔️ फायदे
- दीर्घकालीन उत्पन्न मिळते.
- भारताबाहेर निर्यातीसाठी मोठी मागणी.
- आंब्याच्या बागेचे आयुष्य 25–30 वर्षे.
केळी लागवड अनुदान योजना
✔️ अनुदान किती मिळते?
- प्रति हेक्टर ₹40,000 ते ₹55,000 पर्यंत अनुदान मिळते.
✔️ पात्रता
- सिंचन सुविधा असणे आवश्यक
- किमान 0.2 हेक्टर जमीन असावी
✔️ फायदे
- 12 महिन्यांत उत्पादन
- 12 महिने विक्रीची संधी
- जलद उत्पन्न व कमी गुंतवणूक
शेतकऱ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा व 8A
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- सिंचन साधनांची माहिती (ठिबक/स्प्रिंकलर)
- जमीन नकाशा (जिओ-टॅग)
अर्ज कसा करावा? (Online Process)
1) महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज (MAHADBT)
फळबाग लागवडीचे सर्व अर्ज महाडीबीटी पोर्टलवर स्वीकारले जातात.
अर्ज प्रक्रिया:
- महाडीबीटी वेबसाईट उघडा
- “कृषी विभाग” निवडा
- “फळबाग लागवड योजना” निवडा
- लॉगिन/नोंदणी करा
- आवश्यक माहिती भरा
- कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज सबमिट करा