शेतकरी म्हणजे कोण?
शेतकरी म्हणजे तो माणूस जो
- मातीशी जुळून,
- स्वतःची काळजी न घेता,
- गरीबातल्या गरीब आणि श्रीमंतातल्या श्रीमंत दोघांच्याही पोट भरणारा असा हा एकमेव तो माणूसच – शेतकरी!
शेतकरी म्हणजे बारा महिने कष्ट करणारा, सामान्य गरीब माणूसच असतो. गरिबीमुळे स्वतःला शेतीसाठी पैसे कुठून आणायचे – कारण शेतीत बराच खर्च येतो, पण कोणाकडून घ्यायचे हे नेहमीच विचारात पडते. म्हणून शेतकरी शेतातील अडचणी भगवानच्या भरोशावर कर्ज घेतो आणि आपल्या जीवाला दिलासा देऊन शेतकामाला लागतो. शेतातून उत्पन्न आले तर ते कर्जही भरायचे, नाहीतर कसे काय भरायचे? म्हणून काही शेतकरी तर कर्जामुळे आत्महत्याही करतात. हे विश्वास ठेवूनच…
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी ही एक कर्जमाफी योजना २०१९ पासून सुरू करण्यात आली. २०२५ मध्ये ही आणखी सविस्तर आहे आणि आज आपण तिची सविस्तर माहिती घेणार आहोत.
या योजनेद्वारत आत्ताच्या काळात कर्जमाफीची रक्कम ५०,००० रुपयांपर्यंत वाढवून दिलेली आहे. या योजनेचा सर्वांत प्रथम लहान शेतकऱ्यांना प्राधान्याने दिला जातो, नंतर मध्यम वर्गीय शेतकऱ्यांना दिला जातो. या योजनेचा जवळपास सर्व लहान शेतकऱ्यांना शेतीत झालेल्या नुकसानीमुळे – वाढते प्रदूषण, बदलते हवामान, बाजारातील कमी-जास्त भाव आणि महागाई यामुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट, तसेच शेतकऱ्यांचे वैयक्तिक समस्या – यामुळे ही योजना शेतकऱ्यांना त्यांचा हक्क नक्की मिळवून देईल.
योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये (महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना)
- ही योजना सध्या ३१ मार्च २०२३ पर्यंतच्या बँकेच्या बाकी राहिलेले कर्जाची माफी करणार आहे.
- २०२५ च्या नवीन माहितीनुसार किसान क्रेडिट कार्ड (KCC) वरील १ लाख रुपयांपर्यंतचे पूर्ण कर्ज माफ करणार आहे. ही सर्वांत खुषीची नवीन गोष्ट शेतकऱ्यांसाठी आहे!
- कर्ज घेतल्यामुळे ज्या पान शेतकऱ्यांचा बँकिंग रेकॉर्ड खराब झाला असेल ते आता कर्ज पूर्णपणे माफ केल्यास स्वच्छ होईल आणि नवीन कर्ज घेण्यासाठी पुन्हा बँकेत प्रवेश मिळेल. याचा प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी मोठा फायदा होणार आहे.
पात्रतेसाठी महत्वाचे निकष
- शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- शेतकऱ्याकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन असावी (म्हणजे लहान व मध्यम शेतकरी)
- आधार कार्ड, बँक पासबुक आणि ७/१२ उतारा हे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
२०२५ चे नवीन अपडेट
२०२५ चे नवीन अपडेट वाचून तुम्ही खूपच-खूप आनंदी होणार आहात! एप्रिल महिन्यात महाराष्ट्र सरकारने एप्रिल २०२५ मध्ये तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थी यादी जाहीर केली आहे, ज्यात ५ लाख शेतकऱ्यांची नावे समाविष्ट आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्रात १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे सांगितले असून, शेतकऱ्यांच्या जीवनाला दिलासा देवून परत शेती करण्याची इच्छा जागवून दिली आहे. कर्जबोझ कमी झाल्याने लाखो शेतकरी तणावमुक्त झाले आहेत आणि आता नवीन शेतीसाठी तयार होत आहेत.
ऑनलाइन तपासणी – घरबसल्या तुम्ही मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा PC वरही अगदी सहज चेक करू शकता
सगळ्यात आधी या वेबसाइटवर जा: mjpsky.maharashtra.gov.in (किंवा दुसरी वेबसाइट: mahadbt.maharashtra.gov.in) वर जावे.
१. मुख्य पेजवर “लाभार्थी यादी” किंवा “Beneficiary List” किंवा “कर्जमाफी यादी” वर क्लिक करा.
२. तुमचा आधार नंबर, जिल्हा, तालुका, गाव आणि बँकेचे नाव टाका.
३. “सर्च” किंवा “Submit” बटन दाबा.
४. तुमचे नाव आले तर eKYC पूर्ण करा – बँकेत जाऊन बोटाचा ठसा द्या किंवा ऑनलाइन OTP ने करा.