Pik Vima Yadi 2024 : नमस्कार मित्रांनो, मागील वर्षी खरीप हंगाम 202324 मध्ये आपण सर्वांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत आपल्या शेतीचा पिक विमा भरला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सुद्धा विमा कंपनी यांना सरकारचा हिस्सा हा दिलेला आहे. तर हा पिक विमा नेमकी कोणाला मिळाला आहे याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.
पिक विमा यादी डाऊनलोड कशी करायची ? | ऑनलाइन स्टेटस कसे पाहायचे ? | Pik Vima Yadi 2024 पिक विमा यादी डाऊनलोड करून यादी कशी पहायची याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना
महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यांमध्ये प्रत्यक्ष शेतकरी यांचा फक्त एक रुपया भरून पिक विमा हा काढून दिलेला होता. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील भरपूर शेतकरी यांनी पिक विमा हा भरला होता.
त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर शेतकरी यांच्या पिकांचे नुकसान हे झाले होते. व भरपूर शेतकरी यांनी तक्रार देखील नोंदवलेली आहे. आपल्या विम्याचा कलेम हा केलेला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा कोणाला मिळणार
खरीप हंगाम 2023-24 चा पिक विमा हा अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी तक्रारही 72 तासांच्या आत केली होती. व त्यांचे नुकसान हे खरोखर झालेले आहे ज्यांचे पंचनामे झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 20000 रुपये मिळणार असे महाराष्ट्र सरकारने जीआर मार्फत सांगितलेली आहे.
हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने तुमचे विमा स्टेटस वाचू शकणार आहात.
यादी कशी पहायची
तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने किंवा विमा कंपनी यांनी कुठल्याही प्रकारची यादी ही जाहीर केलेली नाही. त्यामुळे तुम्ही वैयक्तिक स्टेटस हे फक्त पाहू शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला मागील वर्षाची विमा पोचपावती वरती जो टोल फ्री क्रमांक दिला होता त्या टोल फ्री क्रमांक वरती फोन लावून तुमच्या विमा मंजूर झालेला आहे की नाही याची विचारणा करू शकणार आहात.
जर विमा मंजूर झालेला असेल तर तुम्हाला त्याबाबत माहिती ही भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही त्यांना विचारू शकता की हा विमा तुमच्या भागामध्ये कधीपर्यंत वितरित करण्यात येणार आहे.
तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा . येथे तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजनेची यादी ही लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी योजनांच्या माजी साठी तुम्ही आपल्या चॅनलला व आपल्या पोर्टलला नक्की भेट देत राहा. जय महाराष्ट्र मित्रांनो