ट्रॅक्टर सबसिडी योजना म्हणजे काय?
महाराष्ट्र सरकार नवीन ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देते आणि ते अनुदान थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करते, यालाच ट्रॅक्टर सबसिडी योजना म्हणतात.
ट्रॅक्टर सबसिडी योजना महाराष्ट्रात का आणली?
महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. आपले कष्टाळू शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून देशाचे पोट भरतात. आजच्या काळात खते, बियाणे, मजुरी यांचा खर्च खूपच वाढला आहे, तरीही शेतकरी कसाबसा शेती करतो.शेतकऱ्यांची ही अवस्था पाहून महाराष्ट्र सरकारने ट्रॅक्टर सबसिडी योजना आणली, जेणेकरून कमी वेळेत जास्त काम होईल, मेहनत कमी होईल आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल.
२०२५ मध्ये किती सबसिडी मिळते?
- लहान व मध्यम शेतकरी →४०% सबसिडी (जास्तीत जास्त ₹२ लाख ते ₹३.५ लाखापर्यंत मिळते.)
- अनुसूचित(यादीत समाविष्ट केलेले) जाती-जमाती(जंगलात राहणाऱ्या विविध जमाती) (SC/ST) → ५०% सबसिडी (जास्तीत जास्त ₹४ लाखापर्यंत मिळते.)
- महिला शेतकरी, दिव्यांग शेतकरी → प्राधान्य आणि जास्त सबसिडी (५०-६०% पर्यंत मिळते.)
पात्रता निकष (कोण अर्ज करू शकते?)
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- कमीत–कमी १ एकर शेती असावी.
- ७/१२ उताऱ्यावर वर नाव असावे.
- आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असावा.
- यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे (मूळ स्कॅन कॉपी)
- आधार कार्ड
- ७/१२ व ८-अ उतारा चालू वर्षाचा.
- बँक पासबुकचे पहिले पान किंवा रद्द चेक
- जात प्रमाणपत्र (SC/ST साठी)
- ट्रॅक्टरचे कोटेशन (डीलरच्या लेटरहेडवर)
- स्वयंघोषणापत्र (पोर्टलवरून डाउनलोड करावे)
- रहिवासी प्रमाणपत्र (गरज पडल्यास)
ऑनलाइन अर्ज कसा करावा? (स्टेप-बाय-स्टेप)
१. सर्वात आधी https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा.
२. ‘नवीन अर्जदार नोंदणी’ वर क्लिक करा → आधार क्रमांक टाका → मोबाईलवर OTP येईल → व्हेरिफाय करा.
३. लॉगिन करा → कृषी विभाग → “कृषी यांत्रिकीकरण उपक्रमांतर्गत वैयक्तिक अनुदान योजना” निवडा.
४. अर्ज फॉर्म उघडेल → वैयक्तिक माहिती, शेती तपशील, ट्रॅक्टर मॉडेल, HP, किंमत नीट भरा. ५. सर्व कागदपत्रे चांगल्या दर्जाचे PDF/JPG मध्ये अपलोड करा.
६. स्वयंघोषणापत्र डाउनलोड करा → प्रिंट → स्वाक्षरी → स्कॅन करून अपलोड करा.
७. फॉर्म पूर्ण तपासून ‘सबमिट’ करा → मिळालेला अर्ज क्रमांक (Application ID) नोट करा.
८. ‘Track Your Application’ मध्ये अर्जाची स्थिती तपासत राहा. मंजुरी आल्यावर → ट्रॅक्टर घ्या → बिल अपलोड करा → १५-३० दिवसांत सबसिडी थेट बँक खात्यात जमा!