PM किसान सन्मान निधी योजना – 19 वा हप्ता कधी येणार?

नमस्कार मित्रांनो! पीएम किसान खातेदारांनो, तुमच्यासाठी आज मी एक खास नवीन बातमी घेऊन आलो आहे. तरी तुम्ही आपल्या डोळ्याला डबल चष्मा लावून हा ब्लॉग पूर्णपणे वाचा म्हणजे तुम्हाला सगळं समजेल. भारत सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सम्मान निधि ही योजना चालू केली आहे. या योजनेद्वारे दरवर्षी ६,००० रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात, आणि ही रक्कम ३ हप्त्यांमध्ये (प्रत्येकी २,००० रुपये) जमा होते. पण सध्या सगळ्यांना १९ व्या हप्त्याची सर्वत्र उत्सुकता आहे, आणि ज्याची तुम्ही वाट बघत आहात त्याची आपण पूर्ण माहिती घेणारच आहोत.

पीएम किसान १९वा हप्ता कधी येईल? – कोणत्या तारखेला येईल?

केंद्र सरकारकडून जाहीर केलेल्या माहितीनुसार, १) एप्रिल ते जुलै, २) ऑगस्ट ते नोव्हेंबर, ३) डिसेंबर ते मार्च या प्रमाणे चार हप्त्यांमुळे दिले जाते , ज्यामुळे राज्यानुसार वेळेचा फरक पडतो. परंतु १८ वा हप्ता फेब्रुवारी २०२५ सुमारत देण्यात आला होता, त्यामुळे १९ वा हप्ता २०२५ च्या मे ते जूनच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे.

मात्र, शासनाच्या आदेशानुसार, १८ वा हप्ता हा ५ ऑक्टोबर २०२४ रोजी डायरेक्ट पीएम किसान खातेदारांच्या खात्यात जमा केला होता. १९ वा हप्ता मात्र २०२५ च्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल असं पण काही कारणाने १९ हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हातून जारी करण्यात आला.

शेतकऱ्यांनी या १० गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे:
ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करावे .

आधार कार्ड बँक खात्याशी जोडावे.

बँक खाते नेहमी चालू ठेवावे.

७/१२ आणि ८-अ नेहमी अपडेट ठेवावे.

भू-सत्यापन (Land Seeding) पूर्ण करून ठेवावे करून घ्या.

जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबात कोणी आयकर (Income Tax) भरत असेल तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही.

पेन्शन १०,००० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही.

जमीन २ हेक्टरपेक्षा जास्त असेल तर लाभ घेता येणार.

मोबाईल नंबर हा आधार कार्डाशी जोडलेला असावा.

PM Kisan पोर्टलवर स्टेटस नेहमी तपासत राहावे.

निष्कर्ष / विचार
शेतकरी बांधवांनो, आता 19वा हप्ता देखील 24 फेब्रुवारी 2025 रोजी तुमच्या खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे आपण PM किसान सन्मान निधी या योजनेवर खरंच विश्वास ठेवू शकतो. आता आपण पुढील म्हणजे 20व्या हप्त्याची वाट पाहूया.

Leave a Comment