पोल्ट्री फार्मिंग योजना – कुक्कुटपालनासाठी सरकारी अनुदान

भारतामध्ये ग्रामीण भागात शेतीसोबत पोल्ट्री फार्मिंग म्हणजे कुक्कुटपालन खूप फायदेशीर व्यवसाय मानला जातो. तसेच सोप्पे आणि जास्त नफा देणारे साधन मानले जाते. यातून तुम्ही कोंबडी विकून पैसे कमवू शकता आणि अंडी विकूनही पैसे कमवू शकता.

खूप करून यात महिला, पुरुष तसेच तरुण वर्गही उतरले आहेत कारण हा उद्योजक व्यवसाय दिवसेंदिवस बाजारात खूप वाढत चालला आहे. यासाठी कमी जागा लागते, कमी मेहनत लागते आणि उत्पादनाची मात्रा जास्त मिळते. त्यामुळे अनेक शेतकरी तरुण हा व्यवसाय सुरू करू लागले आहेत. सरकारसुद्धा कुक्कुटपालनासाठी अनेक योजना राबवत आहे.

तर आपण या ब्लॉगमध्ये कुक्कुटपालनासाठी मिळणारे सरकारी अनुदान, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज कसा करु शकतो आणि फायदे सुद्धा सोप्या भाषेत पाहणार आहोत.

कुक्कुटपालनासाठी महत्त्वाच्या सरकारी योजना

1) राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM – National Livestock Mission)

ही योजना MSME आणि लहान व्यवसाय पद्धतीने कुक्कुटपालन सुरू करणार्‍यांसाठी आहे.

अनुदान:

  • साधारणपणे 25% ते 35% पर्यंत अनुदान मिळते.
  • SC/ST, महिला, दिव्यांग उद्योजकांना 35% अनुदान मिळते.
  • इतर सर्वांसाठी 25% अनुदान मिळते.

कशासाठी अनुदान मिळते?

  • पोल्ट्री शेड बांधकामासाठी
  • उपकरणे (फीडर, ड्रिंकर, ब्रूडर)
  • चूजे खरेदी
  • फीड व्यवस्थापन

2) PM FME योजना (PM Formalization of Micro Food Enterprises)

कुक्कुट उत्पादने -अंडी, मांस) प्रोसेस करून विकणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

अनुदान:

  • 35% पर्यंत अनुदान मिळते.
  • ₹10 लाखपर्यंत लाभ मिळते.

3) अटल ग्रामीण उद्योजकता योजना / राज्य पशुसंवर्धन योजना

प्रत्येक राज्यात -उदा. महाराष्ट्र) स्वतंत्र कुक्कुटपालन अनुदान योजना उपलब्ध असते.

अनुदान:

  • 25% ते 40% पर्यंत (राज्यानुसार बदलते)
  • 500 ते 5000 क्षमतेच्या पोल्ट्री शेडला अनुदान

⭐ कुक्कुटपालन अनुदानासाठी पात्रता (Eligibility)

  • अर्जदार हा भारतातील नागरिक असावा
  • वय 18 ते 55 वर्षे
  • स्वतःची किंवा भाड्याने घेतलेली जागा असावी
  • प्रकल्प अहवाल (DPR) आवश्यक
  • बँक खातं व आधार अनिवार्य
  • पशुपालन विभागाकडून प्रशिक्षण घेतल्यास प्राधान्य

⭐ अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड / PAN
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जमीन कागदपत्रे (7/12 उतारा / भाडेकरार)
  • बँक पासबुक
  • फोटो
  • प्रकल्प अहवाल (Project Report)
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र (असल्यास)

⭐ कुक्कुटपालन अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

Step 1: योग्य योजना निवडा

  • तुमच्या राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध योजना तपासा.
    (उदा. महाराष्ट्र: ahd.maharashtra.gov.in)

Step 2: ऑनलाईन नोंदणी

  • पोर्टलवर लॉगिन करून नाव, मोबाइल नंबर, आधार क्रमांक भरा
  • प्रकल्पाचे तपशील भरा

Step 3: कागदपत्रे अपलोड करा

  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

Step 4: प्रकल्प अहवाल मंजुरी

  • प्रकल्प जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तपासून मंजूर करतात

Step 5: बँकेकडून कर्ज मंजुरी (लागल्यास)

  • योजना कर्जासह असल्यास बँकेकडून कर्ज मंजुरी घ्यावी

Step 6: बांधकाम / व्यवसाय सुरू

  • प्रकल्प सुरू करून बिल व फोटो विभागाला द्या

Step 7: अनुदान खात्यात जमा

  • तपासणी झाल्यानंतर अनुदान रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते

⭐ कुक्कुटपालनाचा अंदाजे नफा.

  • 1000 ब्रॉयलर कोंबड्या → 45 दिवस
  • प्रति पक्षी 1.8–2.2 kg वजन
  • निव्वळ नफा साधारण ₹15,000 ते ₹35,000 प्रती बॅच (प्रदेशानुसार बदल)

Leave a Comment