शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी विविध कृषी अवजारांची आवश्यकता असते. कमी खर्च करून, कमी मेहनत घेऊन जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी रोटावेटर आणि पॉवर टिलर ही अत्यंत आवश्यक उपकरणे आहेत. सरकार दरवर्षी शेतकऱ्यांसाठी या उपकरणांवर मोठे अनुदान उपलब्ध करून देते. तसेच या ब्लॉगमध्ये आपण रोटावेटर आणि पॉवर टिलरवर मिळणाऱ्या अनुदानाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
रोटावेटर म्हणजे काय आणि त्याचे फायदे?
रोटावेटर हे जमिनीची नांगरणी करण्यासाठी तसेच माळ तयार करण्यासाठी आणि तणनियंत्रणासाठी खूप उपयुक्त ठरणारे एक महत्त्वाचे कृषी अवजार आहे.
प्रमुख फायदे
- कमी वेळेत जास्त काम आणि खोल नांगरणी करता येते.
- जमिन सुपीक होते.
- गवत किंवा लहान वनस्पती काढण्यासाठी खूप उपयोगात येते.
- डिझेलची खूप बचत होते.
- पिकांचे उत्पादन वाढ होते.
पॉवर टिलर म्हणजे काय?
पॉवर टिलर हे लहान चालणाऱ्या ट्रॅक्टरसारखे एक आधुनिक कृषी यंत्र आहे. छोटे आणि मध्यम शेतकरी या यंत्राचा मोठ्या प्रमाणात व खूप फायदेशीर असा वापर करतात.
फायदे
- लहान शेतात सहज वापर करू शकतो.
- पेरणी, नांगरणी, काटेरी झुडुप काढण्यासाठी, शेतातील पिकांवर,कीटकनाशकावर खत देण्यासाठी खूप उपयोगात येते.
- डिझेल चा खर्च कमी होते.
आपल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी 40% ते 60% पर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाते. महिला शेतकरी तसेच अनुसूचित जाति/अनुसूचित जमाती आणि अल्पभूधारकांना ही सबसिडी 70% पर्यंत देखील मिळू शकते.
अनुदानाचे अंदाजे दर
| साधन | अनुदान टक्केवारी | अंदाजे अनुदान रक्कम |
|---|---|---|
| रोटावेटर | 40%–60% | ₹20,000 ते ₹45,000+ |
| पॉवर टिलर | 50%–60% | ₹40,000 ते ₹75,000+ |
कृषी अवजारे अनुदानासाठी पात्रता
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे,
- स्वतःच्या नावावर शेती असावी (7/12 असावा)
- आधार कार्ड, बँक खाते असावे
- मोबाईल नंबर असावा.
- संबंधित अवजाराची कोटेशन घ्यावे.
अर्ज कसा करावा? (ऑनलाइन प्रक्रिया)
बिल/इनोईस अपलोड केल्यानंतर अनुदान तुमच्या खात्यात जमा होते.
MAHADBT पोर्टल किंवा MAHAAGRIS योजनेत लॉगिन करा.
यादीतील “कृषी यांत्रिकीकरण योजना” (Farm Mechanization) निवडा.
रोटावेटर / पॉवर टिलर पर्याय निवडा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
शेतकऱ्यांची माहिती भरून अर्ज सबमिट करा.
तपासून झाल्यानंतर खरेदीसाठी SMS मिळते.
खरेदी करून बिल अपलोड केल्यानंतर अनुदानाची रक्कम खात्यात जमा होते.