आपले बिचारे शेतकरी संपूर्ण आयुष्य राब-राब राबून संपूर्ण देशाचे पोट भरतात. हे पाहून आपल्या सरकारने शेतकरी पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांचे वय झाल्यानंतरही त्यांनी या योजनेचा आर्थिक लाभ घेऊन आपल्या गरजा पूर्ण कराव्यात आणि शेती करत राहावी, अशी सरकारची अपेक्षा आहे.
या ब्लॉगमध्ये आपण पात्रता, फायदे, अर्ज कसा करावा तसेच आवश्यक कोणकोणती कागदपत्रे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत.
शेतकरी पेन्शन योजना म्हणजे काय?
ही योजना वृद्ध शेतकऱ्यांसाठी आहे. म्हणजेच वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेअंतर्गत मिळणारा प्रतिमहिना लाभ घेऊन शेतकरी आपल्या गरजा भागवू शकतात.
योजनेचे प्रमुख फायदे
1️⃣ दरमहा आर्थिक मदत
६० वर्षांनंतर शेतकऱ्यांना दर महिना एक ठराविक रक्कम पेन्शन स्वरूपात मिळते.
2️⃣ कुटुंबाला लाभ
ज्या शेतकऱ्याला पेन्शन मिळते शेतकऱ्याचे निधन झाल्यास त्यांची पत्नी किंवा पती यांनाही पेन्शनचा लाभ मिळत राहतो.
3️⃣ वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षा
जास्त वय झालेल्या शेतकऱ्याचे शेती उत्पन्न कमी झाले तरी रोजच्या गरजांसाठी ही योजना आर्थिक मदत देते.
4️⃣ कमी कागदपत्रे – सोपी प्रक्रिया
या योजनेचा अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने करता येतो.
✔ योजनेसाठी पात्रता
- अर्जदार भारताचा नागरिक असले पाहिजे.
- नोंदणी करताना वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असायला पाहिजे.
- अर्जदार शेतकरी म्हणून यादीत नोंदवलेले असावा.
- कुटुंबाचे एकूण उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेत असावे
- कोणतीही शासकीय किंवा खासगी पेन्शन योजना घेतलेली नसावी
✔ आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा किंवा शेतीशी संबंधित कागदपत्रे
- पॅन कार्ड (पर्यायी)
- बँक खाते पासबुक
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट साईज फोटो
✔ योजना कशी कार्य करते?
- शेतकरी १८ ते ४० वयोगटात या योजनेची नोंदणी करतो
- नोंदणीनंतर दरमहा थोडी रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागते
- शेतकऱ्याइतकाच वाटा सरकारही भरते
- वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन सुरू होते
- शेतकऱ्याचे निधन झाल्यास कुटुंबीयांना पेन्शनचा लाभ मिळतो
✔ ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- अधिकृत कृषी विभागाच्या संकेतस्थळावर किंवा CSC केंद्रावर भेट द्या
- आधार क्रमांकाद्वारे OTP पडताळणी करा
- वैयक्तिक माहिती भरा
- शेती व बँक खात्याचे तपशील अपलोड करा
- प्रीमियमची रक्कम निवडून भरणा करा
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पेन्शन पासबुक दिले जाते
✔ ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक किंवा CSC केंद्रावर भेट द्या
- अर्ज फॉर्म घ्या व आवश्यक कागदपत्रांसह जमा करा
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर SMS द्वारे माहिती दिली जाईल