WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

बांधकाम कामगार : सर्व कल्याणकारी योजनांची माहिती

Bandhkam Kamgar Yojana : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन हे आपल्या राज्यातील कामगारांसाठी विविध योजना राबवत असते. यामध्ये आपण बांधकाम कामगार यांच्यासाठी राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत.

बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची | भांडी संच कसा मिळवायचा | साहित्य पेटी कशी मिळवायची | इत्यादी योजनांची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.

बांधकाम कामगार योजनेची ओळख

बांधकाम कामगार यांना विविध योजना पासून पूर्वी वंचित राहावे लागत होते. हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केलेली आहे. या मंडळामार्फत आपल्या राज्यातील सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी ही ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने स्वीकारली जात आहे.

यासाठी नोंदणी शुल्क एक रुपया एवढे आहे. सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

योजनेचे नाव बांधकाम कामगार योजना
राज्य महाराष्ट्र
ऑफिशियल वेबसाईटhttps://mahabocw.in/
नोंदणी शुल्क एक रुपया
वय मर्यादा 18 ते 60 वर्ष दरम्यान

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी पुरुष व महिला हे दोन्ही पण करू शकतात. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. तत्पूर्वी तुमची पात्रता ही तपासून घ्यायची आहे .

बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आवश्यक पात्रता

कामगार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खालील पात्रताही पूर्ण करावी लागणार आहे.

  • नोंदणी करण्यासाठी अर्जदार यांचे वय 18 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असावे.
  • मागील 90 दिवसांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असले पाहिजे.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

तर मित्रांनो वरील पात्रता ह्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहेत.

कागदपत्रे कोणती लागणार

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता ही लागणार आहे.

  • अर्जदार यांचे रंगीत प्रिंट आधार कार्ड
  • अर्जदार यांच्या पती /पत्नी, मुले या सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स
  • एक पासपोर्ट फोटो
  • मोबाईल नंबर
  • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

वरील माहिती व कागदपत्रे जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करायला काही हरकत नाही.

कल्याणकारी योजनांची माहिती

बांधकाम कामगार यांना भरपूर योजनांचा लाभ हा देण्यात येतो. यामधील काही महत्त्वाच्या योजनांची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

  • भांडी संच योजना
  • साहित्य पेटी
  • बांधकाम कामगार यांच्या स्वतःच्या विवाहासाठी तीस हजार रुपये
  • दोन लाख रुपये पर्यंत विमा
  • मुलांना शिक्षणासाठी खर्च
  • महिला कामगार यांना प्रस्तुतीसाठी पंधरा हजार रुपये पर्यंत लाभ
  • मोफत आरोग्य तपासणी
  • गंभीर आजारांच्या उपचारासाठी एक लाख रुपये
  • एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत बंद ठेव ही देण्यात येते

तर मित्रांनो अशा बऱ्याच योजना ह्या बांधकाम कामगार यांच्यासाठी राबवल्या जात आहेत. याचा अर्ज हा तुम्ही खाली डाऊनलोड करू शकता सर्व योजनांचे अर्ज हे तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

अर्ज कुठे व कसा करायचा ?

बांधकाम कामगार योजनेचा अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सुद्धा करू शकता. असे सर्व अर्ज तुम्हाला खाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

त्याची पीडीएफ लिंक ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याच पद्धतीने ऑफलाइन करत असाल तर तुम्ही ऑफलाइन अर्ज डाऊनलोड करायचा आहे.

तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्हाला अर्ज करायचा आहे. जर अर्ज करताना काही अडचणीत असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. नक्कीच तुम्हाला मदती करण्यात येईल, मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला सुद्धा जॉईन होऊ शकता येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या योजनांची अपडेट तुम्हाला देण्यात येते.

Leave a Comment