Birsa Munda Vihir Yojana Maharashtra : नमस्कार मित्रांनो, या लेखांमध्ये आपण आदिवासी शेतकरी बांधव यांच्यासाठी राबवण्यात येणारी बिरसा मुंडा विहीर योजना याबद्दल माहिती घेणार आहोत. यासाठी ऑनलाईन अर्ज कुठे करायचा ? कागदपत्रे कोणती लागणार ? पात्रता काय आहे ? याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.
बिरसा मुंडा विहीर योजना ऑनलाइन अर्ज | वीर बिरसा मुंडा विहीर योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्वात आधी माहिती समजून घ्या व त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे.
Birsa Munda Vihir Yojana Maharashtra
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आदिवासी शेतकरी बांधवांसाठी बिरसा मुंडा विहीर योजना ही राबवण्यात येते. यामध्ये शेतकरी बांधव यांना दोन लाख 50 हजार रुपये पर्यंत विहिरीचे खोदकाम करण्यासाठी अर्थसाहाय्य हे करण्यात येते. यासाठी महाडीबीटी या पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू आहे.
योजनेचे नाव | बिरसा मुंडा विहीर योजना |
राज्य | महाराष्ट्र |
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अनुदान | 2.5 लाख |
या योजनेची लाभार्थी निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते. याची निवड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मेसेज हा येत असतो. सविस्तर माहिती तुम्हाला खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
बिरसा मुंडा विहीर योजना आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे व माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही महाडीबीटी या पोर्टल वरती नोंदणी करू शकणार आहात.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर
- आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असावा
- जीमेल खाते
वरील कागदपत्रे व माहिती ही तुमच्याकडे असेल तर तुम्ही महाडीबीटी या पोर्टल वरती नोंदणी करू शकणार आहात. व त्यानंतर विहीर योजनेसाठी अर्ज करू शकता.
पात्रता
वीर बिरसा मुंडा विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- या योजनेचा लाभ फक्त आदिवासी शेतकरी यांना देण्यात येईल
- यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेल्या नसावा
- लाभार्थी यांच्याकडे आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र असावे किंवा जातीचा दाखला असावा.
वरील पात्रताही तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?
विहीर योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या सीएससी केंद्रावर भेट द्यायचे आहे. किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून खालील स्टेपने अर्ज करू शकणार आहात.
- सर्वात आधी महाडीबीटी या पोर्टलला भेट द्या
- नवीन शेतकरी नोंदणी करा
- लॉगिन करा
- विशेष योजना या ऑप्शन वरती क्लिक करून वीर वीरसा मुंडा विहीर योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला शुल्क भरायचे आहे
- अर्ज सबमिट करून प्रिंट काढून घ्या
वरील प्रमाणे तुम्ही वीर बिरसा मुंडा विहीर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा करू शकणार आहात.
तर मित्रांनो बिरसा मुंडा विहीर योजनेचा ऑनलाईन अर्ज करत असताना जर तुम्हाला काही अडचणीत असेल तर तुम्ही खाली कमेंट करून सांगा किंवा आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा येथे तुम्हाला मदती करण्यात येईल. अशाच प्रकारच्या सर्व सरकारी योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.