ई पीक पाहणी २०२४ : नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम २०२४ ची e pik pahni ही १ ऑगस्ट पासून सुरू झाली आहे . ही पीक पाहणी कशी करायची याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत .
ई पीक पाहणी कशी करायची | पीक पाहणी कशी करायची | पिकांची नोंदणी कशी करायची | बंधावरची झाडे कशी नोंदवायची याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत .
ई पीक पाहणी २०२४ खरीप हंगाम
महाराष्ट्र सरकार हे शेतकरी बांधव यांच्या साठी विविध योजना राबवत असते. यामध्ये महाराष्ट्र सरकारने 2018 सालीपासून ई पीक पाहणी हा प्रकल्प सुरू केलेला आहे . खरीप हंगाम 2024 ची पिक पाणीही सुरू झालेली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आपल्या पिकाची नोंदणी ही नोंदवायची आहे.
योजनेचे नाव | ई पीक पाहणी |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | महाराष्ट्र शासन कृषी विभाग |
पीक पाहणी एप्लीकेशन लिंक | येथे क्लिक करा |
अंतिम मुदत | 30 ऑक्टोबर |
ई पीक पाहणी आवश्यक माहिती
तुमच्या शेतातील पिकांची नोंदणी सातबारा वरती नोंदवण्यासाठी तुमच्याकडे खालील माहिती असल्यास तुम्हाला ई पीक पाहणी करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे तुम्ही खालील माहिती तुमच्याकडे नक्की ठेवा.
- शेतीचा गट क्रमांक
- कोणते पीक किती क्षेत्रामध्ये घेतलेली आहे याची माहिती
- बांधावर असलेली झाडे
- पडीत जमीन
- घर शेत्र खालील जमीन
वरील माहिती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ई पीक पाहणी ही अत्यंत जलद करू शकणार आहात.
ई पीक पाहणी कशी करायची
ई पीक पाहणी खरीप हंगाम 2024 करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गूगल प्ले स्टोर वरून ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे. e pik pahni 2024
त्यानंतर तुम्ही खाली स्टेप्स फॉलो करायचे आहेत.
- एप्लीकेशन ओपन करा
- तुमचा विभाग निवडा, जिल्हा तालुका गाव व शेत जमीन असलेल्या गट क्रमांक टाकून नवीन शेतकरी नोंदणी करायची आहे.
- तुमचा सांकेतांक टाकून लॉगिन करा
- त्यानंतर पडीत जमिनीची नोंदणी करा
- कोणत्या क्षेत्रामध्ये किती पीक घेतलेली आहे त्याची सविस्तर माहिती भरा
- बांधावर असलेली झाडांची संख्या नोंदवा
- भरून झालेली माहिती सर्वर वरती अपलोड करा
वरील प्रमाणे तुम्ही ई पीक पाहणी हे करू शकणार आहात. जर तुम्हाला ई पीक पाहणी करताना काही अडचणीत असेल तर तुम्ही खाली कमेंट करून सांगा . नक्कीच तुम्हाला मदती करण्यात येईल.
अशाच प्रकारचे सर्व सरकारी योजनांच्या व महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या पोर्टलला नक्की भेट देत रहा येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या माहिती या उपलब्ध करून देण्यात येतात. e pik pahni 2024