E Pik Pahni Kashi Karaychi : ई पीक पाहणी कशी करायची याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत. खरीप हंगाम 2024 ची पिक नोंदणी सुरू झालेली आहे. यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी एप्लीकेशन वरून सर्व माहिती ही भरायची आहे.
खरीप हंगाम 2024 ची पिकाची नोंदणी सातबारा वरती स्वतः शेतकरी करू शकणार आहेत. तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणती पिके घेतली. याची सविस्तर माहिती तुम्ही सात बारा वरती स्वतः नोंदवू शकणार आहात. तर ही सर्व प्रोसेस कशी करायची याची माहिती व व्हिडिओ सुद्धा तुम्हाला येथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
ई पीक पाहणी थोडक्यात माहिती
महाराष्ट्र शासनाने 2018 सालीपासून पीक पाहणी हा प्रकल्प सुरू केलेला आहे. यामध्ये शेतकरी यांनी स्वतःच्या शेतातील पिकांची नोंदणी ही स्वतःच सात बारा वरती करायची आहे. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये विहीर बोरवेल किंवा पडीत जमेल त्याचप्रमाणे कोणती झाडे आहेत व किती आहेत याची संख्या सुद्धा शेतकरी हे स्वतः नोंदवू शकणार आहेत.
त्यामुळे शेतकरी यांना तलाठी ऑफिस मध्ये हेलपाटा मारण्याची गरज नाही. मोबाईल वरती सर्व माहिती ही तुम्हाला भरता येणार आहे.
ई पीक पाहणी केल्याचे फायदे
जे शेतकरी पिक पाहणी करतील त्यांना खालील प्रकारचे लाभ व सरकार योजनांचा लाभ मिळणार आहे.
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभागी होता येणार आहे.
- जर नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर नुकसान झाले तर तुम्हाला सरकार मदत करते त्यावेळी तुमची ए पीक माहितीची सरकारला अनुदान वितरित करण्यास मदत होते.
- नुकसान भरपाई मिळते.
- तुम्हाला कर्ज मिळण्यास मदत होते.
तर मित्रांनो ही पीक पाहणी केल्याचे भरपूर हे फायदे आहेत.
E Pik Pahni Kashi Karaychi
ई पीक पाहणी ही खालील प्रमाणे करायची आहे . त्या साठी तुम्ही खालील प्रमाणे स्टेप्स ह्या करायच्या आहेत .
- “ई पीक पाहणी” हे App Download करा .
- नवीन खातेदार नोंदणी करा .
- पिकांची माहिती नोंदवा . व पिकांचा फोटो अपलोड करा .
- बांधावरची झाडे नोंदवा .
- माहिती अपलोड करा .
वरील प्रमाणे तुम्ही ई पीक पाहणी ही करायची आहे . अधिक माहिती पाहिजे असल्यास वरील विडियो पहा . तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण असेल तर खाली कमेन्ट करून सांगा तुम्हाला नक्की मदत ही करण्यात येईल .