इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना : आपल्या राज्यातील गरीब कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी भरपूर योजना ह्या महाराष्ट्र सरकार राबवत आहे. यामध्ये केंद्र सरकारने इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना सुरू केलेली आहे. या योजनेमार्फत 65 वर्षांवरील सर्व पुरुष व महिलांसाठी 1500 रुपये एवढी रक्कम ही प्रत्येक महिन्यात देण्यात येते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचा लाभ कसा घ्यायचा ? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील ? ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? ऑफलाइन अर्ज कुठे जमा करायचा ? याची सविस्तर माहिती आपण येथे उपलब्ध करून दिली आहे.
इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना
आपल्या राज्यातील 65 वर्षावरील नागरिकांना 1500 रुपये रक्कम देण्यात येते. यासाठी ऑनलाईन अर्ज हे सेतू कार्यालयामध्ये करावे लागत असतात. याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
योजनेचे नाव | इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना |
लाभ | 1500 रुपये प्रति महिना |
अर्ज कुठे करायचा | तहसील कार्यालय किंवा सेतू कार्यालय |
कोणी करायचा | 65 वर्षावरील व्यक्ती |
राज्य | महाराष्ट्र |
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज हे सेतू कार्यालय मध्ये केले जातात. यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता ही भासणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे ही लागणार आहेत.
- अर्ज
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
- बँक पासबुक
- मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- अर्जदारांचा फोटो
- शाळा सोडल्याचा दाखला
इत्यादी कागदपत्र ही तुम्हाला सुद्धा योजनेचा लाभ घेण्यासाठी लागत असतात.
अर्ज कुठे जमा करायचा
वृद्धापकाळ योजनेचा अर्ज हा तुम्ही सर्व कागदपत्र नीट व्यवस्थित जोडून सेतू मध्ये जमा करायचा असतो. त्यानंतर तुम्हाला सेतू कार्यालय मधून पोचपावती ही देण्यात येते.
. त्यानंतर पुढील तीन महिन्यांमध्ये तुमचा अर्ज हा तपासण्यात येतो व तुम्ही पात्र आहात की अपात्र हे ठरविण्यात येते, तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला महिन्याला 1500 रुपये हे मिळत असतात.
तर मित्रांनो शेतू कार्यालय मध्ये तुम्ही अर्ज हा जमा करायचा आहे. पोहोच पावती घ्यायला विसरू नका. या योजनेची अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही तहसीलदार यांच्याशी संपर्क साधू शकता.
तसेच खाली कमेंट करून तुमचे प्रश्न आहे विचारू शकता. आणि अशाच प्रकारचे सर्व सरकारी योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप चॅनलला नक्की फॉलो करा म्हणजे ते तुम्हाला सर्व प्रकारच्या अपडेट्स वेळेवरती मिळत असतात.