Ladka Bhau Yojana Maharashtra : महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे. आता लाडका भाऊ योजना सुद्धा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. लाडका भाऊ योजना काय आहे ? याचे अर्ज कुठे व कसे करायचे ? अर्ज कुणी करायचे ? याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
” मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजनेचे नावे महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजना म्हणून सुरू केलेली आहे. ही योजना पूर्वीपासून चालू आहे. मात्र यामध्ये आता प्रशिक्षण घेत असताना त्यांना काही पैसे मिळणार आहेत. तर याची सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र
लाडका भाऊ योजनेचे ऑनलाईन अर्ज हे सुरू आहेत. त्याबाबत महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे. यामध्ये सुशिक्षित तरुणांना रोजगार निर्माण करून देण्यात येणार आहे.
योजनेचे नाव | लाडका भाऊ योजना |
राज्य | महाराष्ट्र |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
सविस्तर माहिती | पीडीएफ डाउनलोड करा |
लाभ | 10000 प्रति महिना |
लाडका भाऊ योजनेची पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
- अर्जदार यांचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असावे.
- लाभार्थी हा बारावी पास/आयटीआय/पदविका/पदव्युत्तर यापैकी धारक असावा.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे अत्यंत आवश्यक आहे.
- उमेदवारांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असावे.
वरील पात्रता तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहेत.
लाभ किती मिळतो व कसा मिळतो ?
लाडका भाऊ योजनेअंतर्गत खालील प्रमाणे लाभ हे देण्यात येणार आहेत.
अनुक्रमांक | शैक्षणिक पात्रता | दिला जाणारा लाभ |
---|---|---|
1. | 12 वी पास | रुपये 6000 |
2. | आयटीआय/पदविका | रुपये 8000 |
3. | पदवीधर/पदव्युत्तर | रुपये 10000 |
वरील प्रमाणे लाडका भाऊ योजनेचे लाभ हे देण्यात येणार आहेत. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही खालील प्रमाणे अर्ज हा करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा
लाडका भाऊ योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप चा फॉलो करायचे आहेत.
- सर्वात आधी https://rojgar.mahaswayam.gov.in/ या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला नोंदणी ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- तुम्हाला खाली नोकरीच रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमची पर्सनल डिटेल्स व जन्मतारीख टाकायची आहे.
- पुढे अर्ज भरायला सुरुवात करायची आहे व सर्व माहिती अचूक भरली आहे याची खात्री करा.
- त्यानंतर तुम्हाला एम्प्लॉयमेंट कार्ड हे आलेले असणार ते डाऊनलोड करायचे आहे.
तर एम्प्लॉयमेंट कार्ड आल्यानंतर जेव्हा जॉब मिळावे असतात त्या जॉब मिळावा मध्ये तुम्हाला हे कार्ड व तुमची कागदपत्रे घेऊन जायचे असते व तेथे तुम्हाला लाभ हा मिळणार आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे लाडका भाऊ योजनेची आपण येथे माहिती पाहिली आहे. जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट मध्ये तुमची समस्या सांगा तुम्हाला नक्कीच मदत ही करण्यात येईल.