Motar Sanch Anudaan Yojana : नमस्कार मित्रांनो, या लेखांमध्ये आपण मोटार संचासाठी अनुदान कसे मिळवायचे ? त्यासाठी ऑनलाईन अर्ज कुठे करायचा ? कागदपत्रे कोणती लागतील पात्रता काय आहे याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत.
Motar Sanch Anudaan Yojana | मोटार संच अनुदान योजना महाराष्ट्र| कृषी मोटार संच योजना | ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून दिलेली आहे.
मोटार संच अनुदान योजना महाराष्ट्र
महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी विविध योजना राबवून त्यांना आर्थिक मदत हे करत आहे. त्यामध्ये महाडीबीटी या पोर्टल वरती मोटार संच अनुदान वितरित करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे मागविण्यात येत आहेत.
नक्कीच! महाराष्ट्रातील “मोटार संच अनुदान योजना” संबंधित माहिती खालील तक्त्यात मराठीत दिली आहे:
घटक | तपशील |
---|---|
योजनेचे नाव | मोटार संच अनुदान योजना |
राज्य | महाराष्ट्र |
उद्दिष्ट | कृषी सिंचन सुविधा वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मोटार पंपवर अनुदान प्रदान करणे |
अनुदान रक्कम | Rs . 10000 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन अर्ज किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात अर्ज |
अंमलबजावणी एजन्सी | महाराष्ट्र कृषी विभाग |
संपर्क माहिती | स्थानिक कृषी विभागाचे कार्यालय किंवा टोल-फ्री नंबर |
अतिरिक्त लाभ | सिंचन खर्चात कपात, चांगले पीक उत्पादन, पाण्याची बचत |
योजना कालावधी | ही योजना सरकारच्या धोरणानुसार आणि बजेट वाटपानुसार लागू केली जाते |
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सदर योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. यासाठी महाडीबीटी या पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करणे अत्यंत आवश्यक. या योजनेसाठी रुपये दहा हजार पर्यंत खर्च हा कृषी विभाग देत आहे. व उर्वरित रक्कम ही लाभार्थी यांना करावी लागणार आहे.
मोटार संच अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे
मोठा संच अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे.
- अर्जदार यांच्याकडे विज बिल असावे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदारांच्याकडे सातबारा किंवा आठवतारा असावा.
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- यापूर्वी लाभ घेतल्या नसल्याचे हमीपत्र
- ग्रामसभेचा ठराव
वरील कागदपत्र ही तुम्हाला मोटर संच अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?
मोटर्स अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स वापरायचे आहेत.
- सर्वात आधी महाडीबीटी या पोर्टल ला भेट द्या.
- त्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी करा..
- तुम्ही तयार केलेला युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- सिंचन साधने या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही मोठा संच योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
- त्यासाठी शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
- त्यानंतर तुम्ही पोचपावतीची प्रिंट काढायचे आहे.
वरील प्रमाणे तुम्ही मोटार संच अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे. निवड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर ती मेसेज येणार आहे. त्यानंतर पुढील कागदपत्रे तुम्ही सात दिवसांच्या आत अपलोड करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला कृषी विभागाकडून सहमती पत्र हे मिळणार आहे त्यानंतर तुम्ही मोटार खरेदी करायचे आहे………
तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही सर्व प्रोसिजर ही करायची आहे.. काही अडचण आल्यास तुम्ही खाली कमेंट करून सांगा नक्कीच तुम्हाला मदत ही करण्यात येईल.