Pandit Dindayal Swayam Yojana : नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शाळा कॉलेजमधील विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचे नाव आहे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना. या योजनेमार्फत आदिवासी मुलांना प्रतिवर्षाला 60 हजार रुपयाचे राहण्याचा खर्च हा देण्यात येतो. तर हा खर्च नेमकी कुणाला देण्यात येतो याची सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील गरीब आदिवासी विद्यार्थी यांना बाहेरगावी शिक्षण घेण्यासाठी राहण्याची सोय ही उपलब्ध राहत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार हे पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत मदत करत आहे. ज्या मुलांचा हॉस्टेलला नंबर लागत नाही त्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ हा देण्यात येतो.
पंडित दीनदयाल उपाध्याय योजना
ज्या विद्यार्थ्यांना आदिवासी वस्तीगृह याच्यामध्ये प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना वर्षाला 60000 रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात.
या अनुदानापासून विद्यार्थ्यांनी शहरांमध्ये राहून शिक्षण घेणे. त्यांना शिक्षण घेण्यास कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये हा महाराष्ट्र सरकारचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचे नाव | पंडित दीनदयाल उपाध्याय योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र |
लाभ | साठ हजार रुपये प्रति वर्ष |
ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
या योजनेचा लाभ हा आठवी पास पासून पुढील शाळा कॉलेज वर्गातील विद्यार्थ्यांना हा देण्यात येतो. यासाठी तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण हे घेत असावेत.
कागदपत्रे कोणती लागणार
पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता ही लागणार आहे.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- मागील वर्षाचे गुणपत्रक
- मेडिकल सर्टिफिकेट
- डोमासाईल
- शाळेचे बोनाफाईड
वरील कागदपत्र ही तुम्हाला पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे.
ऑनलाईन अर्ज कसा करायचा
पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स पूर्ण करायचे आहेत.
- सर्वात आधी तुम्हाला वरती ऑफिशियल वेबसाईट दिली आहे त्या लिंक वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचे आहे.
- तुम्ही तयार केलेल्या युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेमध्ये अर्ज करा व कागदपत्रे सर्व अपलोड करा.
- त्यानंतर हा अर्ज तुम्ही तुमच्या शाळा कॉलेजमध्ये जमा करायचा आहे.
- तुमची प्रेसेंटेनुसार तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत.
तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे. हा ऑनलाइन अर्ज तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही जवळच्या सायबर कॅफे वरती जाऊन तुम्ही हा अर्ज भरून घ्यायचा आहे व अर्ज हा शाळा कॉलेजमध्ये जमा करायचा आहे.
मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या पोर्टलला नक्की भेट देत रहा येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या सरकारी योजनांची माहिती ही देण्यात येते.