WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

PMFBY Last Date Maharashtra: पीक विमा भरण्याच्या मुदतीत वाढ , ही आहे अंतिम तारीख ..

PMFBY Last Date Maharashtra : महाराष्ट्र राज्यामध्ये पिक विमा योजना योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरणे 15 जून पासून सुरू झालेले होते. व त्याची अंतिम मुदत ही 15 जुलै ही होती. पण ही मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अर्ज आता तुम्ही 31 जुलै पर्यंत करू शकणार आहात.

तर मित्रांनो या लेखांमध्ये आपण आपल्या मोबाईल वरून पिक विमा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ? त्याचप्रमाणे जर तुम्ही सीएससी चालक असाल तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.

प्रधानमंत्री पिक विमा अंतिम तारीख

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यानंतर कोणत्याही शेतकऱ्यांना अर्ज हे करता येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज हे करून घ्यायचे आहेत.

Yojana Name PMFBY Maharashtra
State Maharashtra
Start Date 15 June 2024
End Date 31 July 2024
Official WebsiteClick Here

PMFBY Maharashtra Online Apply

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करायचा आहेत. जर तुम्ही तुमच्या मोबाईल वरून अर्ज करणारा असाल तर तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करायचे आहेत.

  • सर्वात आधी तुम्हाला Google वरती तुम्हाला PMFBY असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला https://pmfby.gov.in/ या वेबसाईट वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला फार्मर लॉगिन किंवा जर तुम्ही सीएससी चालक असाल तर सीएससी लॉगिन करून तुम्ही अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
  • तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये बँक पासबुक, सात बारा, पीक पेरा हे स्कॅन करून ठेवायचे आहेत.
  • त्यानंतर तुम्हाला बँकेची माहिती भरून व तुमची पर्सनल डिटेल्स भरून तुम्हाला पिक विमा अर्ज हा भरायचा आहे. व शेवटी तुम्हाला कागदपत्र अपलोड करून एक रुपयाचे पेमेंट हे करावे लागणार आहे.

तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज हा अगदी सोप्या पद्धतीने भरू शकणार आहात. जर तुम्हाला काही अडचणीत असेल तर आपण खाली एक व्हिडिओ बनवत आहोत. या व्हिडिओ वरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे. व त्या पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे.

तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या MahaHelp.Com या वेबसाईट वरती नक्की भेट द्या. जय महाराष्ट्र मित्रांनो.

Leave a Comment