संजय गांधी निराधार अनुदान योजना :- महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील लोकांसाठी विविध योजना राबवत असते. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमार्फत निराधार लोकांना प्रति महिन्याला 1500 रुपये एवढे देण्यात येतात.
तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ? अर्ज कुठे व कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण येथे उपलब्ध करून दिलेली आहे. सर्वात आधी तुम्ही ही माहिती समजून घ्यायची आहे. त्यानंतर अर्ज हा करायला सुरुवात करायची आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना
संजय गांधी निराधार योजनेमार्फत विधवा, दिव्यांग, दुर्धर आजार ग्रस्त, अनाथ, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीस, 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्रियांना लाभ देण्यात येतो.
संजय गांधी निराधार योजनेमार्फत वरील लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये एवढे त्यांचे बँक अकाउंट मध्ये जमा करून देण्यात येतात.
योजनेचे नाव | संजय गांधी निराधार अनुदान योजना |
राज्य | महाराष्ट्र |
लाभ | 1500 प्रति महिना |
ऑफिशियल वेबसाईट | आपले सरकार |
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्र
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे लागणार आहेत.
- वयाचा दाखला
- पंधरा वर्षे पूर्वीपासून महाराष्ट्र राज्यात रहिवास करत असल्याचा दाखला किंवा पुरावा
- विधवा महिला अर्जदार करिता पतीचा मृत्यू दाखला
- दिव्यांग व्यक्तीसाठी दिव्यांग असल्याचा दाखला
- अनाथ दाखला
- दुर्धर आजार प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मतदान कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- रहिवासी दाखला
- अर्जदाराचा फोटो
वरील कागदपत्र ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लागत असतात.
अर्ज कुठे करायचा असतो
संजय गांधी निराधार योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज हा तुम्हाला सेतूमध्ये करावा लागत असतो. त्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये सेपरेट विभाग हा देण्यात सुद्धा आलेला असतो. यामध्ये जाऊन तुम्ही संजय गांधी निराधार योजनेसाठी तुमची पात्रता तपासू शकता.
या योजनेचे ऑनलाईन अर्ज हे आपले सरकार या पोर्टल वरती स्वीकारण्यात येतात. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये एवढे बँक खात्यामध्ये जमा करून देण्यात येतील.
तर मित्रांनो अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ हा तुम्हाला घ्यायचा आहे. या योजनेची सविस्तर माहिती पाहिजे असल्यास तुम्ही जवळच्या सेतू कार्यालय मध्ये जाऊन या योजनेबद्दल अधिक माहिती हे मिळू शकता.